यावल प्रतीनिधी- देशातील केन्द्र शासनाने शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवुन देशाच्या अन्नदात्यास न्याय द्यावा या मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटीच्या यावल तालुका कमेटीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या मागणीत करण्यात आले आहे.
तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना देण्या आलेल्या यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने देण्यात आलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की , मागील पाच ते सहा महीन्या पासुन संपुर्ण देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीच्या संकटात लॉक डाऊन असतांना देखील कष्टकरी बळीराजा शेतकरी बाधंवानी कांदयाचे उत्पादन घेतले असुन , आता कुठ कांद्याला चांगला भाव येवु लागल्याचे दिसत असतांना या कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण देशातील मोदीच्या लहरी केन्द्र शासनाने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे.
या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळुन शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे . तरी , कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा केन्द्र शासनाने घेतलेला कांदा निर्णयबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा . अशी मागणी जळगाव महानगर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी यावलच्या वतीने कॉग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरूड नावरे सरपंच समाधान पाटील , शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजु पिंजारी , नगरसेवक मनोहर सोनवणे , काँग्रेस अनुसुचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, समीर शेख , हाजी ईकबाल खान ,हाजी गफ्फार शाह, रहेमान बिर्ल्डस, लिलाधर सोनवणे ,जाकीर मेंबर आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.