टिटवी येथील शेतातून मोटरसायकल चोरीला

पारोळा प्रतिनिधी- तालुक्यातील टिटवी येथील शेतातून मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिटवी येथील रहिवासी आण्णा सोनार हे 14 सप्टेंबर रोजी आपली मोटारसायकल ने टिटवी शिवारातील आपल्या शेतात गेले होते त्यांनी आपली मोटारसायकल क्रमांक एमएच 19 बी इ-6943 ही शेतातील एका पिंपळाच्या झाडाखाली लावली होती. दुपारी 4 वाजता ते शेतातून परतून आले असता त्यांना मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. त्यांनी शेजारील शेतकऱ्यांना या संदर्भात विचारपूस केली असता कोणीही त्या संदर्भात माहिती दिली नाही. किंवा गाडी आढळून आली नाही. 

परिणामी त्यांनी आज दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार आशिष चौधरी करीत आहेत.

Protected Content