केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा

शेअर करा !

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी याबाबतची माहिती एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

त्यांना कोरोनव्हायरसची लागण झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ट्विट केले. त्याआधी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना कोविड -१९ ची लागण झाली आहे.

नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की काल मला अशक्तपणा जाणवत होता आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझ्या तपासणी दरम्यान मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व शुभेच्छा देऊन मला आत्ता बरे वाटले आहे. आपण स्वत:ला क्वॉरंटाईन केले असल्याची माहिती देखील गडकरी यांनी या ट्विटमध्ये दिली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!