औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तर खरे हिंदुत्व – राणा

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यावर राजद्रोह लावता, तर औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांना काय लावणार, कबरीवर जाणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तर खरे हिंदुत्व आहे, असे आव्हान खा.नवनीत राणा यांनी दिले आहे.

ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी आमदार आणि खासदार असलेले राणा दाम्पत्य नवी दिल्लीच्या हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, यासाठी हनुमान मंदिरात आम्ही आरती करणार असल्याचे राणा दाम्पत्याने म्हटले आहे.

दरम्यान , हनुमान चालिसा म्हणणाऱ्याना राजद्रोह, मग एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी, खा. इम्तियाज जलील, वारीस पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण  करण्याला काय? हनुमंताने मला वज्र द्यावे, मी दात तोडण्याचे काम करेन असे राणा दाम्पत्याने म्हटले आहे. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचेच असतील तर औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, आणि खरे हिंदुत्व आहे, यावर आमचा विश्वास बसेल, असे नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content