मोदी सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकारण आणि सोशल अजेंडा राबवण्यात जास्त रस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारने राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिल्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला, अशी टीका भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.

 

यावेळी रघुराम राजन यांनी म्हटले की, सध्याच्या सरकारने निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:चा राजकीय व सामाजिक अजेंडा पूर्ण करण्याला अधिक प्राधान्य दिले. अगोदरच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दोषपूर्ण अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. दुर्दैवाने, सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला. तसेच केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतोय, असेही मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content