रावेर प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील नेपानगर येथील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी सभा घेतल्या.
मध्य प्रदेशच्या नेपानगर विधानसभा मतदारसंघात कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार रामकिशन पटेल विजयी करण्यासाठी मतदारांना अवाहन करण्यासाठी आ चौधरी मध्य प्रदेशमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी निंबोलामध्ये रैली केली. तर नेपानगर मध्ये कॉर्नर मिटिंग घेऊन अंधारवाडी, बदनापूर, भाटखेडा, बऱ्हाणपूर, हैदरपूर मध्ये देखील प्रचार केला. यावेळी त्यांच्या सोबत माजी प्रदेशध्यक्ष अरुण यादव, निवडणुक प्रभारी राजेन्द्र सिंह, आर. के. दोंगणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर महाजन चुडामण पाटील, कैलाश पाटील, गन सिंग, अशोक पाटील, कमल अग्रवाल आदी उपस्थित होते.