भिलाला कुटुंबाला सरकारी मदत

रावेर, प्रतिनिधी । बोरखेडा हत्याकांड प्रकरणात भिलाला कुटुंबीयांना आदिवासी विभागातर्फे तातडीची दोन लाखाची मदत आज तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते करण्यात आली सोबत आधार कार्ड रेशन कार्ड व बँक पासबुक सुध्दा रुमलीबाई भिलाला,सजंय भिलाला यांना देण्यात आले.

बोरखेडा नजिक भिलाला कुटुंब बाहेर गेले असतांना त्यांच्या चार भावंडाची कु-हाडीने हत्या करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन निघाला होता. या कुटुंबा शासनाकडून सहकार्य म्हणून आज आदिवासी विकास विभागातर्फे दोन लाख रूपयांचा चेक सोबत महसूल विभागाकडून रेशन कार्ड बँक, पासबुक व आधारकार्ड तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी निळे निशान सामाजिक संघटने अध्यक्ष आनंद बाविस्कर, कॉग्रेस कार्यध्यक्ष राजू सर्वेने ,उमेश गाढे, तलाठी दादाराव कांबळे, गृहपाल श्री तडवी आदी उपस्थित होते.

Protected Content