शेंदूर्णीतील दुकाने पाच दिवस बंद ठेवा ; मुस्लिम बांधवांची मागणी

शेंदुर्णी, प्रतिनिधी । येथील मुस्लिम समाजातर्फे पाच दिवस दुकाने बंद ठेवण्याबाबतचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यात २१ते २५ मेपर्यंत गावातील बाजारपेठ बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेंदुर्णीत कोरोनाचा प्रादुर्भाव बघता व रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधव खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने घरा बाहेर पडू शकतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून कोरोनाला आमंत्रण मिळू शकते त्यामुळे शेंदुर्णी येथील बाजारपेठ पाच दिवस बंद ठेवून या राष्ट्रीय आपत्तीमध्ये सहकार्य करण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवण्याची विनंती केलेली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील मुस्लीम समाज बांधवांनी सामाजिक अंतर ठेवून प्रमुख पंचांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पवित्र रमजान ईद निमित्त समाज बांधवांच्या वतीने कोणत्याही प्रकारचे नवीन कपडे वस्तू खरेदी केल्या जाणार नाही. तसेच गावामध्ये कोणत्याही फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्या जाणार नाही. यासाठी सर्व समाज बांधव अहोरात्र मेहनत घेत असून दिनांक २१ ते २५ मे पर्यंत पाच दिवस गावातील बाजारपेठा बंद ठेवाव्यात जेणेकरून करण्याचा प्रादुर्भाव रोखता येईल असा बैठकीतील निर्णय घेण्यात आला.या निर्णयानुसार निवेदनाद्वारे शेंदुर्णी नगरपंचायत, व्यापारी असोसिएशन यांना पाच दिवस बंद ठेवण्याबाबत मागणी करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील मुस्लीम समाजातर्फे पवित्र रमजान मध्ये दुकानांवर गर्दी न होण्यासाठी पाच दिवस दुकाने बंद ठेवण्याचे निवेदन नगरपंचायत मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांना देण्यात आले यावेळी फारूक खाटीक,जावा शेठ व इतर पंच कमिटी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते शेंदूर्णी येथे आधीपासूनच ३ दिवसाचा जनता कर्फ्यु पाळला जात आहे.

Protected Content