यावल येथे काँग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम

यावल  प्रतिनिधी । केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कायद्यांच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे शहरात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.                         

केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी व कामगारांच्या विरोधातील कायद्याच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम कार्यक्रम आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार रमेशदादा चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच जि.प.गटनेते तथा तालुका अध्यक्ष यावल , प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील  बुरूज चौकात पार पडला.

या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष इंटक भगतसिंग पाटील , पंचायत समितीचे काँग्रेस गटनेता शेखर सोपान पाटील, शहराध्यक्ष कदिर खान, अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह,  अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रहेमान खाटीक, सद्दाम शाह,शहर उपाध्यक्ष नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर,हाजी ईकबाल खान,अनिल जंजाळे,राजु भाऊ करांडे,सकलेन,  आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.  

यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्याक्रमा दरम्यान अनेक काँग्रेसचेपदाधिकारी,कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर यांनी या स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेवुन निवेदनावर सहया केल्या.आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. आज पर्यंत यावल शहरात ३५००शेतकरी व कामगार यांनी स्वाक्षरी केल्या आहेत अशी महिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान यांनी दिली.  सदर भारतातून  दोन कोटी सह्यांचे निवेदन हे सोनियाजी गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना  पाठविले जाणार आहे.

 

Protected Content