गुलाबराव देवकरांची गाडी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अडविली !

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या थकीत वेतनासाठी आक्रमक झालेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची गाडी कारखान्याच्या गेटवर अडवून आपला रोष व्यक्त केला.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. तर आज सकाळपासून आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, आज सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास साखर कारखान्याला भेट दिली. याप्रसंगी गेटवरच कर्मचार्‍यांनी त्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला.

Protected Content