विमा कंपनीने सरसकट नुकसानभरपाई दिली पाहिजे – फडणवीस

 

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । विमा नसलेल्या शेतकऱ्यांनादेखील सरकारने मदत करावी. विमा कंपनीनेदेखील शेतकऱ्यास सरसकट नुकसानभरापाई दिली पाहिजे. अशी मागणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या ठिकाणी केळीच्या बागांचं झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेत आहेत. या अगोदर त्यांनी खासदार रक्षा खडसे यांची देखील भेट घेतली आहे. यांनी केळी बागांचं झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी हि भूमिका मांडली 

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ मुक्ताईनगर तालुक्यातील उंचादा येथे मी आलो आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. १०० टक्के केळी बागाचं नुकसान झालेलं आहे. मी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांची अशी अपेक्षा आहे की, एकतर विमा कंपनीने सरसकट त्यांना नुकसानभरापाई दिली पाहिजे. कारण, विमा कंपनी विविध मुद्दे उपस्थित करून अडचणी निर्माण करत आहे. सरकारने देखील मोठ्याप्रमाणावर मदत केली पाहिजे. ज्या शेतकऱ्याचा विमा नाही त्याला देखील सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी ज्यांचा विमा नव्हता त्यांनाही ५० टक्के रक्कम विमा काढला असं समजून त्या काळात दिली होती.”

 

आता विम्याची रक्कम मिळताना अडचण होत आहे. मागील काळात तत्कालीन आमदार हरिभाऊ जावळे यांची एक समिती आम्ही तयार केली होती. आणि हरिभाऊ जावळे समितीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवून त्यावेळेस आपण तसं टेंडर काढलं होतं आणि त्यावर्षी विमा कंपन्यांनी चांगला पैसा शेतकऱ्यांना दिला. मात्र मागील वर्षी हरिभाऊ जावळे समितीचे सर्व निकष बदलवण्यात आले आणि नव्या निकषाने केळीच्या विम्याचा हा टेंडर काढला गेला. त्यामुळे विमा कंपन्यांचा आता अधिक फायदा होतो आहे. विमा कंपन्या पाहिजे त्या प्रमाणात मदत करत नाहीत. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की, हरिभाऊ जावळे समितीचे जे निकष होते, त्या निकषानुसारच या ठिकाणी केळीचा विमा उतरवला गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे.” असं देखील फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

 

Protected Content