शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी फडणवीसांचा ताफा अडवला (व्हिडीओ)

मुक्ताईनगर पंकज कपले । मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील वादळग्रस्त शेतीतील हानीच्या पाहणीसाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा शेतकरी आणि शिवसैनिकांनी मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात अडवला होता. 

मोजक्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीसांनी निवेदन स्वीकारल्यानंतर पोलिसांनी पुढचा मार्ग मोकळा केला. जिल्ह्यातील प्रमुख शेती उत्पादन असलेल्या केळीच्या पीक विम्याचे निकष केंद्र सरकारने बदलल्यामुळे हे शेतकरी संतापलेले होते. या प्रमुख मागणीसह शेतीच्या समस्या आणि त्रासदायक केंद्र सरकारची धोरणे या मुद्द्यांचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. 

पोलिसांनी मोजक्याच लोकांना फडणवीस यांच्याशी चर्चेची परवानगी दिली होती. शेतमाल हमीभाव , खतांच्या आणि बियाण्यांच्या किमती, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या अन्य सुविधांसाठीही हे शेतकरी आग्रही होते. मुक्ताईनगर, जळगाव, येथील राजकीय घडामोडींच्या पार्शवभूमीवर राजकारण रंगलेले असताना शिवसैनिकही या शेतकऱ्यांच्या सोबत सहभागी झाल्याने स्थानिक राजकीय संदर्भांनीसुद्धा या आंदोलनाची चर्चा रंगली होती. कोणत्याच राजकीय पक्षाला शेतीच्या समस्यानाकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

  

Protected Content