अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबई प्रतिनिधी । १०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज अखेर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात हजर झाले असून त्यांच्या चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांना ईडीने अनेकदा समन्स बजावले होते. मात्र असे असूनही त्यांनी आजवर ईडीच्या चौकशीला पाठ दाखविली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर असून आज त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांची फक्त चौकशीच होणार की, त्यांना अटक करण्यात येणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content