फाईव्ह-जी सेवेचा शुभारंभ : पंतप्रधानांनी केले उदघाटन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अतिशय वेगवान इंटरनेटची सुविधा प्रदान करणार्‍या फाईव्ह-जी नेटवर्क सेवेची आज अधिकृतपणे सुरूवात करण्यात आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसच्या उदघाटनपर सत्रात देशात फाईव्ह-जी सेवेचा शुभारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये हे नवीन नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. तर, पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील बहुतांश भागात ही सुविधा मिळणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.

फाईव्ह-जी नेटवर्क हा संपर्क क्रांतीतला महत्वाचा टप्पा मानला जात आहे. याच्या माध्यमातून विद्यमान मोबाईल इंटरनेटपेक्षा किमान २० पटीने अधिक गतीमान इंटरनेट मिळणार आहे. याचा फक्त स्मार्टफोनधारकांनाच नव्हे तर अन्य क्षेत्रांनाही लाभ होणार आहे. भारतात जिओ आणि एयरटेल या दोन कंपन्यांनी फाईव्ह-जी सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.

Protected Content