ताप्ती सातपुडा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सावदा प्रतिनिधी । येथील ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने (दि.१९) रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तापी सातपुडा राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षिका,मुख्याध्यापक,महिला,पोलीस कर्मचारी,आरोग्यसेविका,महिला डॉक्टर्स,महिला पत्रकार,महिला लेखक,कवी,इतिहासकार,साहित्य  यांसह विविध क्षेत्रात सक्रीय कार्य करणाऱ्या शिक्षण,समाजसेवा,ग्रामसेवा,कृषी सेवा,शेती विकास ,कामगार,उद्योग- लघुउद्योजक व्यवसाय, साहित्य,कला,क्रीडा,वैद्यकीय,अभियांत्रिकी विविध ११ क्षेत्रांमधून फक्त अकरा व्यक्तींना  राज्यस्तरीय पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे.या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीनी आपले प्रस्ताव दि.१५ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्यातील पुरुष, महिला,युवक,युवती यांचे समाजात योगदान आहे अशा व्यक्तीना  सम्मान देऊन त्यांचा गौरव करणे हे अभिमानास्पद कार्य असून या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय  उत्तम कार्य करणाऱ्यानी आपले प्रस्ताव सावदा येथील ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोशियन,मोदी केअर सेंटर इंदिरा गांधी चौक येथे  पाठवावे .

कार्यक्रम दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जेहरा मॅरेज हॉल येथे घेण्यात येणार आहे.गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,सत पंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज,शास्त्री भक्ती प्रकाशदासजी,शास्त्री भक्ती किशोरदासजी शास्त्री,सुरेशराज राज मानेकर,खासदार श्रीमती रक्षा खडसे,आमदार चंद्रकांत पाटील,आमदार शिरीष चौधरी,जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना ताई प्रल्हाद पाटील,जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे- खेवलकर,नगराध्यक्षा अनिता येवले,माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,नगरसेवक राजेंद्र चौधरी,माजी उपनगराध्यक्ष उद्योजक हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तरहुसेन (बाबूसेठ) बोहरी यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात येणार आहे.

तरी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे असे आवाहन तापी सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन अध्यक्ष शामकांत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस अनोमदर्शी तायडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजु दिपके,  संपर्कप्रमुख साजिद शेख, सल्लागार लाला कोष्टी, राजेंद्र भारंबे, सभासद रवींद्र हिवरकर, पिंटू कुलकर्णी ,रोशन वाघुळदे, राजेश पाटील, मिलिंद टोके, भारत हिवरे, मिलिंद कोरे,कमलाकर पाटील,अज्जू शेख,विकी भिडे, सिद्धांत तायडे इत्यादी पत्रकार यांनी केले आहे.

 

 

Protected Content