मुक्ताईनगर येथे आमदार रोहित पाटील यांची सदिच्छा भेट!

मुक्ताईनगर,प्रतिनिधी| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पाटील हे आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरला अचानक सदिच्छा भेट देऊन आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पाटील हे जिल्हा बँक निवडणुकीच्या पास्वभुमिवर आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यांनी अचानक मुक्ताईनगरला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मुक्ताई मंदिरात जाऊन आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले. व त्यानंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील वृंदावन या निवासस्थानला भेट दिली. यावेळी रोहित पाटील हे कार्यकर्त्यांशी  संवाद साधताना एकनाथराव खडसे, रोहिणी ताई खडसे यांनी गेल्या वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागात पक्षात नवचैतन्य आलेले आहे. गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. नवे जुने ,गट तट न मानता येथील सर्व कार्यकर्ते एकदिलाने पक्षाचे काम करत आहे. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार बिनविरोध झाले आहे. जिल्हा बँकेत घवघवीत यश मिळेल. व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व स्वराज संस्थेच्या निवडणुकात पक्षाला यश मिळेल. त्यासाठी सर्वानी एकजुटीने मेहनत घ्यायची आहे. एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्या साहेब पाटील, रोहिणी ताई खडसे या आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू असतो. त्यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या सर्व निवडणुका मध्ये एकजुटीने मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेली कारवाई ही राजकीय आकसाने करण्यात येत आहे. एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा नाहक त्रास दिला जात आहे. त्यातुन ते सहीसलामत बाहेर येतील याचा आपल्याला विश्वास असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना ताई चौधरी, सोशियल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील,किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुकाअध्यक्ष यु डी पाटील,प स सभापती विकास पाटील, किशोर गायकवाड,युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील, युवक उपाध्यक्ष पवन पाटील,युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, शहराध्यक्ष राजु माळी, महिला आघाडी शहराध्यक्ष निता ताई पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, नंदकिशोर हिरोळे, चंद्रकांत बढे, व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मुक्ताई मंदिर मध्ये दर्शना प्रसंगी रवींद्र भैय्या पाटील, ह-भ-प श्री रवींद्र हरणे महाराज, ह भ प श्री उद्धव महाराज जुनारे  व भक्त जन उपस्थित होते.

 

 

 

 

Protected Content