आयशर डंपरवर धडकल्याने दोन मजूर जागीच ठार; सहा जखमी

पाचोरा,प्रतिनिधी| मजुरांना ऊसतोणीडीसाठी घेऊन जात असलेला आयशर बंद डंपरवर जाऊन धडक्याने दोन मजूर जागीच ठार तर  ६ जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज धानोरा ते भराडी गावाजवळ घडली आहे. या घटनेत पोलीसांनी चालकाला अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील लाख (तांडा), वरसाडे (तांडा), मोहाडी, हनुमानवाडी येथील २४ ते २५ ऊसतोड मजूर हे फलटन येथील निरा – भिमा सहकारी साखर कारखान्यासाठी २२ आक्टोंबर, शुक्रवारी रोजी पाहाटे दिड वाजेच्या सुमारास एका आयसरने निघाले. सकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान आयसर सिल्लोड तालुक्यातील भराडी गावाजवळील धानोरा फाट्यावर पोहचला. त्यावेळी समोर रोडच्या कडेला बंद डंपर उभा होता. आयसर त्यावर जाहून धडक्याने झालेल्या अपघातात  कॅबिनमध्ये बसलेली कल्पना यमजी पवार (वय – २७) रा. मोहाडी व प्रशांत विठ्ठल वाघ (वय – ३०) रा. हनुमानवाडी हे जागेवरच ठार झाले. तर गाडीत बसलेले निलेश यमजी पवार (रा. मोहाडी ता. पाचोरा), अनिल तंवर (रा. कुऱ्हाड तांडा ता. पाचोरा), दादाभाऊ राठोड (रा. वरसाडे ता. पाचोरा), मोहन भिल रा. लाख (तांडा), रुखमाबाई पवार (रा. वरसाडे ता. पाचोरा), दादाभाऊ पवार (रा. वरसाडे ता. पाचोरा) हे सहा जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान मयतांचे शवविच्छेदन ही सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मयत कल्पना यमजी पवार यांचे पाश्चात्य पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत

 

मयतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी  अशी मागणी मोहाडी येथील माजी सरपंच भिवा शंकर जाधव यांनी  निरा – भिमा सहकारी साखर कारखान्याकडे केली आहे. दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे मोहाडी व हनुमानवाडी गावात शोककळा पसरली आहे.

 

 

Protected Content