लोकमान्य प्रगती पॅनलच्या बैठकीत ८० टक्के जागा जिंकण्याचा निर्धार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | गस सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य व प्रगती पॅनलची संयुक्त बैठक जळगाव जिल्हा शासकीय कर्मचारी संयुक्त संघटनेच्या कार्यलयात घेण्यात आली. यात लोकमान्य व प्रगती पॅनलचे मनोमीलन होवून लोकमान्य प्रगती पॅनल स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत लोकमान्य व प्रगती पॅनल एकत्र झाल्याने आगामी निवडणूक ८० टक्के जागांवर विजयी ठरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

बैठक लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर शिवराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. वेध प्रगती गटाचे अध्यक्ष रवींद्र शहाजीराव साळुंखे, प्रभाकर आप्पा सोनवणे, अशोक श्रावण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमान्य गटाच्या नेतेपदी तत्कालीन गस सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
गसं सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत सभासदांना समोर संस्थेच्या सभासद हितासाठी ध्येय धोरणे आखण्यात आली. कमी व्याजदरात कर्ज , मयत सभासदास शंभर टक्के कर्जमाफी , कर्ज मर्यादा वाढ दिव्यांगांना विशेष कर्ज ठेवींवर विशेष योजना इत्यादी विविध देण्यात येतील. सभासद यांना गटाच्या अध्यक्ष गंजीधर पाटील, गटनेते मगन नाना पाटील, तुकाराम बोरोले सर, गटाचे नेते विलास नेरकर, मुख्याधिकारी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर आप्पा सोनवणे , बी. टी. बाविस्कर, अनिल तळेले राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे समन्वयक सर्जेराव बेडिस्कर जळगाव मनपा संघटनेचे अ. वा. जाधव, सुभाष मराठे, जिल्हा परिषद लेखा संघटना याचे सलीम तडवी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघटनेचे गाजरे आदींनी संबोधित केले. दरम्यान, सभेत संभाव्य प्रमुख उमेदवार यांचा परिचय देण्यात आला

यात स्थानिक मतदार संघ डॉ.रवींद्र शहाजीराव साळुंखे, राजेश रामराव पवार, अमित मगननाना पाटील, प्रा.आर.एस. पाटील, योगेश नन्नवरे (महसूल )
बाहेरील मतदारसंघ- अजित गुलाबराव पाटील , चाळीसगाव , विश्वास राजाराम सूर्यवंशी चाळीसगाव, विलास यादवराव नेरकर(इमाव), डी एन पाटील भडगाव, सुनील निंबा पाटील पाचोरा,संजय भानुदास पाटील जामनेर, मुकेश तुकाराम बोरोले, रावेर, योगेश इंगळे (यावल/भुसावळ ), ज्ञानेश्वर जुलाल पाटील (मुक्ताईनगर /बोदवड ), व. ना पाटील , एरंडोल धरणगाव , विलास मोतीराम पाटील,पारोळा, मगन मुरलीधर बाविस्कर चोपडा, सुनील अमृत पाटील पारोळा. महिला राखीव- जागृती भास्कर पाटील-पवार,पारोळा, वि. जा./भ. ज कोमल जाधव यांचा समावेश आहे.

शिक्षक भारती संघटनेचे सोमनाथ ब्रिजलाल पाटील, अजय कुमार पाटील, नारायण आनंदा वाघ, आर. के. पाटील, सुधाकर सुखदेव सूर्यवंशी, प्रदीप सोनवणे, राजेंद्र ठाकरे, आरसिंग राजपूत, पंजाबराव देशमुख संघटना ,कैलास सोनवणे, आर. के. माळी ,दीपक सूर्यवंशी ,किशोर भाऊराव पाटील जामनेर , किशोर भाऊलाल पाटील ,जळगाव ग्रामीण आदिवासी विकास पतसंस्थेचे संचालक तसेच अध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना जळगाव जिल्हा उपस्थित होते. प्रास्ताविक संजय भानुदास पाटील यांनी केले.  साहेबराव पाटील, सा. दे. महाजन, सुरेश पाटील, वाय. एम. पाटील , डी. ए. पाटील, महसूल संघटनेचे योगेश नन्नवरे. नूतन मराठा उपाध्यक्ष प्रवीण जाधव. किरण तळेले. शिवाजी पाटील, शांताराम पाटील, पी. डी. पाटील, राजेंद्र सिंग पाटील, अनिल झोपे सर, प्रा. डी. पी. पवार, गिरीश वाणी, आदी बहुसंख्य सभासद उपस्थित होते. प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच म.ना पा संघटना न.पा संघटना सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचारी संघटना, आदिवासी विकास संघटना, कास्ट्राईब संघटना तसेच जिल्हा आरोग्य व हिवताप कर्मचारी संघटना, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,चतुर्थ श्रेणी संघटना , वाहन चालक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/570472507538694

 

Protected Content