जामनेर प्रतिनिधी | कर्जतचे आमदार रोहित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून मुक्ताईनगर जयकडे जाताना जामनेर शहरातील भुसावल चौफुलीवर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संजय गरुड महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील वि जे एन टी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया अर्जुन पाटील राजेश नाईक प्रल्हाद बोरसे दीपक राजपूत भगवान पाटील अर्जुन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली.
त्या दरम्यान शहरातील भुसावळ रोडवरील जय भोले या वडापाव सेंटरवर पोहा नाश्ता केला व चहा घेतला त्यामुळे रस्त्यावर आमदाराने नाष्टा व चहा घेतल्यामुळे यावेळी आमदार रोहित पवार यांचा साधेपणा जामनेर करायला पाहायला मिळाला जामनेर तालुक्यातील विविध समस्या व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा पदाधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार कडे विविध विषयावर चर्चा केली व समस्या मांडल्या यावेळी त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते पुढील मार्गाला निघून गेले.