शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करुन मदत द्या – साहेबराव पाटील

sahebarao patil

 

जळगाव, प्रतिनिधी | यंदा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व अन्य बाधितांनाविशेष पॅकेज जाहीर करुन मदत उपलब्ध द्यावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.

 

त्यात त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हातात आलेली सर्वच पिके ह्या पावसामुळे वाया गेली आहेत. अश्यावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर प्रचलित दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात यावी. या विशेष पॅकेजद्वारे कोरडवाहू शेतीस प्रचलित दरानुसार रुपये ६८०० प्रती हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम रुपये १३२०० प्रती हेक्टर अशी एकूण रुपये २०,००० हजार, ओतिला खालील शेतास प्रचलित दरानुसार रुपये १३,५०० प्रती हेक्टर या व्यतिरिक्तअधिकची विशेष रक्कम रुपये १६,५०० प्रती हेक्टर अशी एकूण रक्कम रुपये ३०,००० हजार आणि बहुवार्षिक फळ पिकांकरिता प्रचलित दरानुसार रुपये १८,००० प्रती हेक्टर या व्यतिरिक्तअधिकची विशेष रक्कम ३२,००० प्रती हेक्टर अशी एकूण रक्कम रुपये ५०,००० इतकी मदत महाराष्ट्र शासन- निर्णय क्रमांक २०१४/प्र.प्रा.११८/म -३ क्रमांक ३४६ दिनांक २० मार्च, २०१४ अन्वये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरीता आपद्ग्रस्त शेतकर्यांना व अन्य बांधितांना विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्याच धर्तीवर प्रचलित दरानुसार दिल्या जाणाऱ्या रक्कमे व्यतिरिक्त अधिकच्या विशेष रक्कमेसह कमीत कमी कोरडवाहू शेतीस रुपये २०,००० प्रती हेक्टर, ओलिता खालील शेतीस रुपये ३०,००० प्रती हेक्टर आणि बहुवार्षिक फळ पिकांकरीता रुपये ५०,००० प्रती हेक्टर याप्रमाणे सरसकट मदत देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, त्यांनाही विमा कंपन्यांकडून तत्काळ मदत मिळावी, यासाठी संबधित कंपन्यांनाही तसे निर्देश द्यावेत. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची “जानेवारी – २०१९ ते मार्च – २०२०” या कालावधीची “वीज देयके” राज्य शासनामार्फत भरण्यात येवून आपद्ग्रस्त शेतकऱयांना खरीप-२०१९ या हंगामातील नुकसान भरपाईसह पशुधनासाठी वैरणाचीही मदत लवकरात लवकर देण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Protected Content