कोरोनाचा स्फोट : आज जिल्ह्यात ४१८ पॉझिटीव्ह रूग्ण !

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात नवीन ४१८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ४१८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १३१ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल चोपडा तालुक्यात ४५ तर चाळीसगाव तालुक्यात ४४ रूग्ण आढळून आले आहेत.

अन्य ठिकाणांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ-२९; अमळनेर-१५; भडगाव-२; धरणगाव-२५; यावल-१६; एरंडोल-१०; जामनेर-३८; रावेर-३३; पारोळा-५; मुक्ताईनगर-२; बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील-० अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ८६०५ इतका झालेला आहे. यातील ५४७० रूग्ण बरे झाले आहेत. आजच २१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रूग्ण वाढीचा आकडा वाढत असल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. आज १२ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४२७ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असली तरी आजवर कधीही चारशेचा आकडा पार केला नव्हता. याचा विचार करता आज रेकॉर्ड ब्रेक रूग्णसंख्या आढळून आली आहे. आज एकूण १२०१ सँपल तपासण्यात आले असून यापैकी तब्बल ४१८ रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे आता संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. एका दिवसात करण्यात आलेल्या चाचण्यांमधून पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे तब्बल ३० टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!