प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील तरूणावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला आज बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, दिनांक ०६.६.२०२० रोजी १३:३० वा सुमारास तुषार अनिल जंजाळे वय -१९ रा.श्रीराम नगर भुसावळ यांच्या फिर्यादीवरु भु.बा.पेठ पो.स्टेला भाग ५ गु.र.न ५९९/२०२० भा.द.वि.क. ३०७ ( गंभीर स्वरुपाची दुखापत ) ३२६,३२३,३४१,१४३,१४७,१४८,१४९,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयातील आरोपी सुश्रुत विनोद झोपे (वय-२७ रा.श्रीराम नगर भुसावळ) हा गुन्हा घडला तेव्हा पासुन फरार होता. आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात गंगाराम प्लॉट भागात या गुन्हयाती आरोपी सुश्रुत विनोद झोपे वय – २७ रा.श्रीराम नगर भुसावळ हा आला असल्याची गुप्त माहीती पो.नि दिलीप भागवत यांना मिळाल्याने पो.नि. अनिल मोरे, पो.ना रविंद्र बिर्‍हाडे,किशोर महाजन,रमन सुरळकर,महेश चौधरी,तुषार पाटील
पो.कॉ विकास सातदिवे,कृष्णा देशमुख,ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी,चेतन ढाकणे,बंटी कापडणे यांच्या पथकाने त्याला अटक केली. ही कारवाई अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पो. अधीक्षक भाग्यश्री नवटके, उप.पो.अधिकारी गजाजन राठोड, निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!