वाळू उपश्यामुळे तयार झालेल्या डोहात मुलाचा मृत्यू

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील १२ वर्षाचा मुलगा वाळू उपशामुळे झालेल्या डोहात बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील १२ वर्षे वय असणारा आनंद श्याम चौधरी हा गावातील मुलगा गुळ नदीत खेकडे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, खेकडे शोधत असतांना तो नदीत रेतीच्या उपश्यामुळे झालेल्या डोहात पाय घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोयखेडा दिगर गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आनंद याच्या घरची परिस्थिती अत्यत हलाखीची असून त्याला तीन बहिणी व दोन भाऊ आई, वडील असा परिवार आहे. जामनेर तालुक्यात अवैध वाळू उपश्याने हा बळी घेतला असून या भागातील महसुली कर्मचारी व अवैध वाळू उचल करणारे यांचे आर्थिक लांगेबांधे असल्याने नदीत असे खड्डे पडून त्यात पाणी साचून डोह तयार होत आहे. त्यामुळेच या मुलाला आपला जिव गमवावा लागला. यामुळे महसूल प्रशासनाच्या विरूध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content