Home Cities जामनेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरक्षा किटचे वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरक्षा किटचे वाटप

0
103

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पहूर पेठ व पहूर कसबे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्रफुल्ल लोढा यांच्या मार्फत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा व भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका आशाताई वर्कर तसेच सर्व पत्रकार बांधव यांना कोरोना सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आरोग्यदूत प्रफुल्ल लोढा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश पाटील, किरण पाटील, रवी मोरे, राजू किसन पाटील,आशिष माळी, महेंद्र बनकर, सरपंचपती रामेश्‍वर पाटील, ग्रां.स.सलीम , कैलास गोंधनखेडे,आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पहूर पेठ व पहूर कसबे येथील पक्षाचे इतर कार्यकर्ते व सर्व पत्रकार बांधव, ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स,तसेच पहूर ग्रामीण रुग्णालय व पहूर कोवीड सेंटर महावीर पब्लिक स्कूल या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने संजय गरुड यांच्या प्रमुख उपस्थित फळ वाटप करण्यात आले.


Protected Content

Play sound