हॉटेल मालक खून प्रकरण : दोन संशयित पोलीस स्थानकात स्वतःहून हजर (व्हीडीओ)

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या असोदा हॉटेलमध्ये आज दुपारी दारू पितांना झालेल्या वादातून हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय ५० रा. आसोदा ता. जळगाव) यांच्या खून प्रकरणातील दोघं संशयित शनिपेठ पोलीस स्थानकात हजर झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी शेजारच्या बिअरशॉपी दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

 

आज दुपारी ५ : ३० वाजेच्या सुमारास नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या आसोदा मटन हॉटेलमध्ये दोन तरुण दारू पीत बसले होते. यावेळी हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्या सोबत कुठल्यातरी विषयातून त्यांचा वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे पर्यावसन हाणामारीवर झाले. यावेळी दोघं तरुणांनी चिरमाडे यांच्यावर हल्ला चढविला. यातील एका हल्लेखोराने बिअरची बाटली थेट चिरमाडे यांच्या मानेत खुपसली. यानंतर जखमी अवस्थेत चिरमाडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोळी नामक तरुण अन्य एकासह शनिपेठ पोलीस स्थानकात हजर झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले होते. तसेच ठसे तज्ञ देखील घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान, मयत चिरमाडे यांचा मुलगा गिरीश याने हल्लेखोरांना पहिले होते. दरम्यान, पोलिसांनी शेजारच्या बिअरशॉपी दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या बिअर शॉपी मालकासोबत हल्लेखोरांनी बिअर फुकट द्यावी म्हणून वाद घातला होता, असेही कळते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/564322610922633/

Protected Content