उटखेड्यात धान्य व किराणा किटचे वाटप

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील उटखेडा लोकवर्गणीतुन जमा करण्यात आलेले धान्य व किराणा सामानाच्या किटचे वाटप प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषारानी देवगुणे यांच्या हस्ते गरजूंना वाटप करण्यात आले.

गावातील गरजू लोकांना ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन धान्य व किराणा देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत ५५६ किलो गहू, तांदूळ व डाळ जमा झाली. या जमा झालेल्या १४,८४० देणगीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट करण्यात येउन मंगळवारी गावातील ३२ गरजूना वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच सविता गाढे, उपसरपंच अफशान तडवी, सदस्य चेतन पाटील, आशा पाटील तलाठी हेमांगी वाघ, ग्रामसेवक अतुल पाटील, ललित चौधरी,संजय गाढे व ग्रामपंचायत कर्मचारी गोटू चौधरी उपस्थित होते. गावातील एकूण ४५ गरजूना ही मदत प्रदान करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content