राफेल, शबरीमाला मंदिर आणि राहुल गांधी प्रकरणात सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार

download 1

 

मुंबई (वृत्तसंस्था) केरळातील शबरीमालाच्या अय्यपा मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना (मासिक पाळी येणाऱ्या महिलांसह) प्रवेश, राफेल घोटाळ्याप्रकरणी फेरविचार याचिका तसेच कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरूद्ध दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

 

सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्याआधी त्यांचे खंडपीठ अनेक मोठे निर्णय देणार आहे. राममंदिरानंतर आता राफेल डील आणि सबरीमालावर आज निर्णय येणार आहे. रूढी परंपरेनुसार शबरीमलातील अय्यपा मंदिरात पाळीच्या वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा आदेश लागू केला होता. त्यानंतर त्या निकालावर एकूण ६५ याचिका दाखल झाल्या असून त्यात ५६ फेरविचार याचिका, चार नव्या व पाच हस्तांतर याचिकांचा समावेश आहे.

 

देशातील बहुचर्चित ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालायात निकाल येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली होती. पारदर्शक पद्धतीनं प्रक्रिया पार पडली असून नियंमांचे उल्लंघन झाले नसल्याचं कोर्टानं सांगितलं. मात्र यात ५८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज निकाल येणार आहे.

 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरूद्ध दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देईल. ही याचिका भाजप नेते मीनाक्षी लेखी यांनी दाखल केली असून, राहुल गांधींनी असे म्हटले आहे की, चौकीदार चोर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. मीनाक्षी लेखी यांनी असा आरोप केला होता की, राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधानांना राजकारणाशी जोडले आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांनी माफीनामा देखील दाखल केला होता, परंतु कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.

Protected Content