देशात २४ तासात आढळले ८९ हजार नवीन कोरोना रुग्ण

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था  । देशात कोरोना संकट  नियंत्रण येतंय असं वाटत असतांना मागील २४ तासात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढली आहे. .  गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तब्बल ८९ हजार १२९ वर गेलीय. यामुळे आतापर्यंतच्या एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० वर पोहचलीय.

 

गेल्या सात महिन्यांमध्ये आढळलेला हा सर्वात मोठा आकडा आहे. या अगोदर २० सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात संक्रमणबाधित ९२ हजार ६०५ रुग्ण आढळले होते.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी ८.०० वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, करोना संक्रमणामुळे शुक्रवारी ७१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा १ लाख ६४ हजार ११० वर पोहचलाय. यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी २४ तासांत संक्रमणामुळे ७१७ मृत्यूची नोंद झाली होती.

 

Protected Content