उद्योग समूहांकडून शासकीय रुग्णालयास दोन व्हेंटिलेटरर्स प्रदान ; ना. पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) फाऊंडेशन ब्रेक मॅन्युफक्चरींग प्रायव्हेट लिमिटेड (ब्रेक्स बिसनेस युनिट) हिताची ऑटोमोटीव्ह सिस्टीम्स ग्रुपच्यावतीने जिल्हा शासकीय रुग्णालयास कोरोना (कोव्हीड-19) महामारीचा प्रतिकार करण्यासाठी दोन व्हेंटिलेटरर्स प्रदान करण्यात आले.

कंपनीचे उत्पादनाचे स्थळ असलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोना (कोव्हीड-19) महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झालेल्यांची संख्या सतत वाढत आहे. त्यांना तातडीने उपचार मिळावे. याकरीता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सामाजिक संस्थांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन कंपनीने जिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवा प्रदान करणा-या यंत्रणेला मदत म्हणून सेवाभावीवृत्तीने हा निर्णय घेतला आहे. व्हेंटिलेटरर्समुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत होणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत होणार आहे.

आज कंपनीचे प्रतिनिधींनी दोन व्हेंटिलेटरर्स जिल्हा सामान्य रुग्णालयास हस्तांतरीत करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी हिताची ऑटोमोटीव्ह सिस्टीमस ग्रुप, जळगावचे प्लांटहेड योगेश फालक आणि मानव संसाधन विभागप्रमुख योगेश सोनार हे उपस्थित होते.

Protected Content