चैतन्य तांडा क्र. ४ येथे विनामास्क नागरिकांना दंड व ग्रामपंचायतीकडून मास्कचे वाटप

 

चाळीसगाव, प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील चैतन्य तांडा क्र.४ व ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज १४ विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान कारवाई दरम्यान मास्क वाटप करून कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली.

 

चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. या पार्श्वभूमीवर चैतन्य तांडा क्र.४ ग्रामपंचायत व ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प नॅशनल हायवे क्र. २११ वरील बायपासच्या ठिकाणी आज भरवण्यात आले. सकाळी १० ते  दुपारी १२ वाजताच्या दरम्यान हि कारवाई करण्यात आली. यावेळी १४ विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून एकूण २८०० रूपयांची वसूली यावेळी करण्यात आली. तसेच कारवाई दरम्यान मास्क वाटप करून कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. या कारवाईत करण्यात आलेली वसूली हि चैतन्य तांडा क्र.४ ग्रामपंचायतीला देण्यात आले. या कारवाईत ग्रामीण पोलीस हवालदार महाजन, बडगुजर तसेच करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य प्रवीण चव्हाण, वसंत राठोड, संदीप चव्हाण, उदय पवार, भाईदास राठोड, गोरख राठोड व जुलाल राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content