बापरे….ते पाचही कोरोना बाधीत अमळनेरातील एकाच कुटुंबातील !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग किती भयंकर पध्दतीत होतो हे आजच्या चाचणी अहवालातून अधोरेखीत झाले असून अमळनेर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना या विषाणूने बाधीत केल्याची माहिती प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार, जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज २४ एप्रिल, २०२० रोजी एकूण १५६ नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी १२८ रुग्णांना कोणतीही कोरोना सदृष्य लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी १२ रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर २८ रुग्णांना अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. तसेच २६ रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत १०५ रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२० संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी ३०२ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या अकरा झाली आहे. त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर ३ रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आज आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण हे एकाच कुटूंबातील असून या कुटूंबातील ५२ वर्षीय महिला यापर्वूीच कोरोना बाधित आढळून आली असून तीचा मृत्यु झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ४ हजार ८८९ रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी ४४६९ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. यापैकी आतापर्यंत २५९ रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content