यावल तालुक्यातील दहा गावांची कुष्ठरोग आरोग्य तपासणी मोहीमेसाठी निवड

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहा गावांची कृष्ठरोग आरोग्य तपासणी मोहिमेसाठी निवड झाली असून यासंदर्भात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे कृष्ठरोग व क्षयरोग सेर्वेक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पहील्या टप्यातील तपासणीसाठी यावल तालुक्यातील डोंगर कठोरा , अट्रावल, न्हावी, मारूळ, किनगाव बु , मालोद, कासारखेडा, नायगाव, सावखेडा सिम, दुसखेडा या१०गावांची क्षयरोग सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. या शिबिरात यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव येथील आरोग्य सहाय्यक जी. एम. खान यानी मार्गदर्शन केले. या शिबीरास तालुक्यातील आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थीत होते. या आरोग्य तपासणी मोहीमेअंतर्गत ५४ आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांच्या वतीने निवड केलेल्या गावात घरोघरी जाऊन सर्व परिवारातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल व संशयीत रुग्ण आढळुन आल्यास त्याची योग्य प्रकारे आरोग्य तपासणी करून तत्काळ उपचार सुरू करण्यात येईल. दोन महीने चालणारे या कुष्ठरोग आरोग्य तपासणी अभियानाव्दारा हे १ फेब्रुवारी ते ३१मार्च कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कृष्ठरोग आरोग्य तपासणी मार्गदर्शन बैठकीस यशस्वी करण्यासाठी
नरेंद्र तायडे, मिलिंद राणे, निलकंठ बोंडे यानी कामकाज पहिले.

Protected Content