जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशी पार; आज सात नवीन पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा सात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५२ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 76 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहेत. तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या सात व्यक्तीमध्ये एक 40 वर्षीय पुरूष हा सम्राट कॉलनी परिसर जळगाव येथील, एक 65 वर्षीय पुरूष हा अडावद, ता. चोपडा, दोन व्यक्ती मध्ये 24 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरूष हे पाचोरा येथील तर अमळनेर येथील तीन व्यक्तीमध्ये 13 व 23 वर्षाचे तरूण व 16 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. यापैकी जळगाव येथील तरूणाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये तीन अमळनेरचे दोन पाचोरा येथील तर अडावद व जळगाव येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. यातील अमळनेरचे तीन रूग्ण हे आधीच्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात सर्वाधीक २३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण हे अमळनेर येथे आढळून आले आहेत. या खालोखाल भुसावळ येथे १०; जळगाव ९; पाचोरा ७; अडावद २ तर एक महिला ही मलकापूरची असून जळगाव कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आजवर जिल्हा कोविड रूग्णालयात तेरा कोराना बाधीत रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content