शार्टसर्कीटमुळे टॉईज व गिफ्टच्या दुकानाला आग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील शिवसागर टॉईज व गिफ्टच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागून हजारो रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शिवसागर टॉईज व गिफ्ट दुकान बंद असतांना गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. ही आग लागल्याचे कळल्यानंतर दुकानदाराने अग्निशमन विभागाला कळविले. अवघ्या १५ मिनीटात अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर रात्री ११ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत हजारो रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक खेळणे, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्यूटर, प्रिंटर, लहान मुलांची खेळणी, फर्निचर, इर्न्हर्टर बॅटरी सर्व जळून खाक झाले होते. याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.

Protected Content