उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस पाटील यांचा सन्मान

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका तरूणीच्या मागे काही टपोरी मुले मागे लागले होते. त्यावेळी टेहू गावातील महिला पोलीस पाटील सानाली महाले यांनी पारोळा पोलीसांना त्वरीत कळवून पोलीसांच्या मदतीने चोपडा येथील आश्रम शाळेत सुखरूप सोडले. या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महिला पोलीस पाटील सोनाली महाले यांचा सन्मान पंचायत समिती कार्यालयात विभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्याहस्ते करण्यात आला.

एक तरूणी ही शहरात फिरत असतांना तिच्यामागे काही टपोरी मुलं लागले होते. त्यावेळी टेहू येथे रात्री १.३० सुमारास एका शेतकऱ्याने पोलीस पाटल सोनाली महाले यांना फोन करून सांगितले की, एक तरुणी आपल्या गावाजवळ फिरत आहे व तिच्या मागे काही मुले वाईट उद्देशाने फिरत असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस पाटील सोनाली महाले टेहू आणि योगेश महाले टेहू यांनी पोलिसांना फोन करून याबाबत कळविले. तात्काळ घटनास्थळी स.फौ. सुनील पवार, पोकॉ अभिजित पाटील यांनी येऊन पोलीस पाटील सोनाली महाले सह योगेश महाले यांनी सदर महिलेस चोपडा तालुक्यातील वेले येथील आश्रम शाळेत सुखरूप सोडले. त्याबद्दल टेहू येथील पोलीस पाटील सोनाली महाले यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी अमळनेर सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

यावळी विभागीय पोलीस अधिकारी नांदवाडकर यांनी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद उत्सव शांततेत पार पाडणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले व निवडणूक आचार संहितेचे काटेकोरपने पालन करावे यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजू जाधव, अमरसिंग वसावे, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी विश्वास पाटील, दिनकर पाटील, भाऊसाहेब पाटील, सुकलाल पाटील, तुकाराम पाटील, राजपाल चौधरी, यांसह पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Protected Content