बोंबला : पोलीस भरतीला स्थगिती : उमेदवार संतप्त

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य शासाच्या गृह विभागाने आगामी पोलीस भरती स्थगित करण्याची घोषणा केली असून यामुळे भरतीची तयारी करणारे तरूण संतापले आहेत.

राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहिती आहे. आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

विशेष बाब म्हणजे, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. रिक्त १४ हजार ९५६ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ हजार ८११ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३५० जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी ४२६ जागा, भटक्या जमाती (ब)साठी ३७४ जागा, भटक्या जमाती (क) साठी ४७३ जागा, भटक्या जमाती (ड) साठी २९२ जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी २९२ जागा, ओबीसींसाठी २ हजार ९२६ जागा, ईडब्ल्यूएससाठी १ हजार ५४४ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार ४६८ जागा; असं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं होतं.

मात्र आज अचानक प्रशासकीय कारणास्तव भरती रद्द करण्यात आली असून यामुळे भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांमध्ये नाराजी तसेच संतापाची लाट उसळली आहे. नवीन भरती प्रक्रिया नेमकी केव्हा राबविणार याची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही.

Protected Content