अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या आर.के. कॉलनीजवळ क्रुझर गाडीने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद काशीनाथ पाटील वय ५० रा. डी.डी.नगर, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार २ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते दुचाकीने अमळनेर शहरातून घरी जात असतांना रस्त्यावरील आर.के. कॉलनीजवळ पुढे चालणाऱ्या क्रुझर गाडीने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून दुचाकीने येत असलेले प्रमोद पाटील यांची दुचाकी क्रुझरवर आदळली. या अपघातात प्रमोद पाटील हे जखमी झाले. त्यांच्यावर अमळनेर येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी अखेर शुक्रवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात क्रुझरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.

Protected Content