”लॉकडाऊन जनतेच्या हिताचे…याचे तंतोतंत पालन करा”- जिल्हा प्रशासन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना जिल्हा प्रशसनाने नागरिकांना लॉकडाऊन हे आपल्या हिताचे असून याचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत वृत्त असे की, आज अमळनेर येथील पाच जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना केल्या असून जिल्हा प्रशासन याचे योग्य पध्दतीत पालन करत आहे. तथापि, काही जणांच्या निष्काळजीपणाचा फटका बसल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने माहिती कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करून लॉकडाऊनचे पालन करण्याची मागणी केली आहे. हे आवाहन आपल्यासाठी जसेच्या तसे सादर करत आहोत.

बंदी नाही संधी

एका तरुण मुलामुळे त्याच्या आई-वाडीलांना कोरोना झाला. कोरोनामुळे एक आई ( वय 52) गेली. तर वडील कोविड रूग्णालयात क्रिटिकल अवस्थेत आहेत..

एवढेच नाही तर बाहेर गावावरून (कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या) आलेल्या आपल्या भावाला भेटण्यास गेलेले त्याचे भाऊ व नातेवाईकही कोरोना बाधित ठरले आहे.

तेव्हा जळगाव जिल्हावासियांनो,
जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला आपल्या जिल्ह्यात, गावात येवू देवू नका, आल्यास पोलीसांना कळवा.

असे मुळीच समजू नका की, बाहेर फिरल्याने काही होत नाही.

तुम्हाला तुमच्या कुटूंबाची काळजी नसेल…..

पण तुमच्या कुटुंबियांना तुमची काळजी आहे.

तेव्हा बेफिकीरपणे, विनाकारण बाहेर पडू नका, रस्त्यावर गर्दी करू नका. लाॅकडाऊन तुमच्या हिताचे आहे. लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करा.

त्याला बंदी न समजता संधी समजा.

घाबरू नका…. पण जागरूक रहा.

( जिल्हा प्रशासनाच्यावतीने जनहितार्थ…..)

Protected Content