मोहाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकला असुन सरपंचपदी धनंजय सोनवणे (डंपी) तर उपसरपंचपदी गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी ५५ वर्षांपासून ग्रामपंचायत बिनविरोधाची सुरू केलेली परंपरा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी कायम ठेवली आहे.

जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्याही निवडणुका झाल्या. निवडणूका जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी पुढाकार घेत त्यांचे वडील स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी मोहाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा ५५ वर्षांपासून सुरू केली होती. ही परंपरा जि.प. सदस्य पवन सोनवणे यांनी कायम ठेवत स्व. भिलाभाऊ सोनवणे यांना अनोखी आदरांजली दिली आहे. 

मोहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनंजय सोनवणे व उपसरपंचपदी गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर सोनवणे यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जळगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा यानिमीत्ताने फडकला आहे.

यावेळी ग्रा. प. सदस्य धनंजय सोनवणे,  ज्ञानेश्वर सपकाळे,  गणेश सोनवणे, परशुराम गवळी,  सजन राठोड , यशोदाबाई पाटील, वैशाली गवळी , पूनम पवन सोनवणे , ज्योती चव्हाण, लीलाबाई सोनवणे,  पूनम सुनील सोनवणे  यांची उपस्थिती होती.

 यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून अर्जुन पचवणे यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य म्हणून ग्रामसेवक दिलीप पाटे व तलाठी सौ. सारिका दुर्गुडे यांनी काम पाहिले तर पोलीस हवालदार जितेंद्र राठोड सिद्धेश्वर ढवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content