डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत १० पैकी ७ जागांवर विकास पॅनलचा झेंडा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीची निवडणूकीचा सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणूकीत १० पैकी ७ जागांवर विकास पॅनलने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. यापुर्वी विकास पॅनलने सरपंचासह एक सदस्य बिनविरोध निवडून आले होते.  धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात उर्वरित ८ जागांसाठी मतमोजणी करण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर हे ग्रामपंचायत घोषीत झाल्यानंतर पहिल्यांचा सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यात एकुण सरपंचासह एकुण १० उमेदवार निवडणून देण्याचे होते. त्यानुसार सुरूवातील सरपंच पदी विकास पॅनलच्या सविता धनराज महाजन आणि सदस्यपदी शितल महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली. त्यामुळे उर्वरित ८ जागांसाठी १९ उमेदवार तीन प्रभागातील निवडणूकीच्या रिंगणात उभे होते.  रविवारी ५ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान धरणगाव तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक १ मधून श्याम भिमराव पाटील, शिला अनिल देशमाने आणि मंगलाबाई परशूराम पाटील हे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक २ मधून चंदन दिलीपराव पाटील, संभाजी शंकरराव सोनवणे आणि स्वाती मंदार चौधरी हे तिघे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक ३ मधून चारूशीला नारायण पाटील, आश्विनकुमार संदीप पाटील हे विजयी झाले आहे.

 

निवडणूकीचा निकाल लागताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. यावेळी धरणगाव पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Protected Content