महाराष्ट्र दिनाच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Collector

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त सर्व संबधित विभागांवर सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज दिले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापनदिन समारंभ पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हाधिकारी दिपमाला चौरे, तहसिलदार वैशाली हिंगे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, पोलिस अधिकरी श्री.चंदेल कावरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जि.आर.सुर्यवंशी, आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनाचे समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 1 मे, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस कवायत मैदानावर आयोजीत करण्यात आला आहे. समारंभासाठी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, साहित्यीक, कवी, विशेष पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रणे देण्यात आली असून त्यांची बैठक व्यवस्था करण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रमूख पाहुण्यांना मानवंदना देणे, परिसराची स्वच्छता आदि कामांचा आढावा घेऊन सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी दिले.

Add Comment

Protected Content