चिमुरडीवर अत्याचारकरणाऱ्या नराधमास फाशी द्या ; भावसार समाजाची मागणी

WhatsApp Image 2020 02 11 at 4.41.26 PM

जळगाव, प्रतिनिधी । आंध्रप्रदेशातील कर्नुल शहर खालास्ट्रिट येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय शेख ख्वाजा शेख करीम नावाच्या  नराधमाने भावसार समाजातील बालिकेवर चॉकलेटचे आमिश दाखवुन लैगिक अत्याचार केला असून त्याच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्यास देहदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, शेख ख्वाजा शेख करीम नावाच्या  नराधमाने भावसार समाजातील ६ ते ७ वर्ष वयाच्या निरागस बालिकेवर चॉकलेटचे आमिश दाखवुन त्याच्या सायकलवर बसून घरी नेवन तिच्यावर अमानुषपणे पाशवी लैंगिक अत्याचार केला. त्याच्या विरूध्द कर्नल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमास अटक सुध्दा करण्यात आलेली आहे. संपुर्ण देशात महिलांवर व निरागस मुर्लीवर जे पाशवी अत्याचार होत आहेत. त्याला आळा बसण्यासाठी अशा गुन्ह्यातील आरोपींचे प्रकरणे फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवुन त्यांना लवकरात लवकर कायद्यानुसार कठोर देहदंडाची शिक्षा व्हावी जेणे करून अशा नराधमांवर कायद्याचा वचक बसेल. या निंदनीय घटनेचा भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळ जळगाव तर्फे तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी आरोपीवर लवकरात लवकर पोस्को कायद्या अंतर्गत खटला दाखल करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवुन आरोपी नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र भावसार समाज कार्याध्यक्ष पंकज भावसार तसेच जळगाव समाज अध्यक्ष उमेश भावसार, ज्येष्ठ रवींद्र भावसार, राजेंद्र भावसार, भालचंद्र भावसार, गोपाळ भावसार, रोहित भावसार, देविदास भावसार,महिला अध्यक्षा वंदना भावसार, सुचीत्रा भावसार, रत्ना भावसार व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content