भुसावळ येथे शिवजयंती महावकृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

WhatsApp Image 2020 02 11 at 5.11.32 PM

भुसावळ, प्रतिनिधी l हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार बालकांच्या मनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्यातर्फे सोमवारी (दि.१०) वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.त्यात शहरातील ३० शाळाच्या २७० स्पर्धकांनी सहभाग घेतला.त्यांनी वकृत्वातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी कथन केली.

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आयोजित शिवजयंती महावकृत्व स्पर्धेला प्रारंभ नगरपालिका शिक्षण सभापती मुकेश पाटील,गटशिक्षण अधिकारी तुषार प्रधान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिव्याख्याता शैलेश पाटील,अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवणे,मुख्याध्यापक बि.वाय सोनवणे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.अथर्व इंगळॆ या चिमुकल्याच्या ओघवत्या भाषणाने स्पर्धेची सुरवात करण्यात आली. या वेळेस प्रथमच शिक्षकांसाठी सुध्दा स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा चार गटात गटात पार पडली. जिजाऊंचा शिवबा,छत्रपती शिवरायांचे बालपण,शिवराज्याभिषेक या विषयावर तिसरी व चौथीच्या पहिल्या गटाच्या माध्यमातून वकृत्व सादर केले.छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ मावळे,छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर पाचवी ते सातवीच्या स्पर्धाकानी दुसऱ्या गटाच्या माध्यमातून शिवरायांची थोरवी कथन केली.उत्तम प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज, गडकोट किल्ले व छत्रपती शिवाजी महाराज, मी छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय या विषयावर आठवी ते दहावीच्या स्पर्धकांनी तिसऱ्या गटाच्या माध्यमातून वकृत्व सादर केले.तर शिक्षकांच्या चौथ्या गटात बाल शिवाजी घडविण्यात आजच्या शिक्षकाची भूमिका,२१ व्या शतकात शिवाजी महाराज अवतरले तर, जिजाऊंचे बाळकडू आधुनिक काळाची गरज, शिवराय नक्की कोणाचे?, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वकृत्व सादर झाले.

३० स्पर्धकांचा एक वर्ग याप्रमाणे १० वर्ग करण्यात आले.प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विजेते काढण्यात येणार आहे.या सर्व विजेत्यांची अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी घेण्यात येणार आहे.नंतर तेथेच प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम व शिव चरीत्र देउन गौरवण्यात येणार आहे.बक्षीस वितरणाची दिनांक आणि ठिकाण सबंधित शाळा आणि स्पर्धकांना वैयक्तीक फोन करुन कळवण्यात येणार आहे.

स्पर्धा प्रकल्प प्रमुख जिवन महाजन यांनी प्रस्ताविक तर स्पर्धा सह समन्वयक समाधान जाधव यांनी स्पर्धेची माहिती दिली. सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी तर आभार समन्वयक हेमांगिनी चौधरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान,शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, ज्ञानेश्वर घुले,प्रदीप सोनवणे,प्रभाकर नेहते,अमित चौधरी, तेजेंद्र महाजन,देव सरकटे,भूषण झोपे,डॉ. जगदीश पाटील, गणेश फेगडे,शिरीष कोल्हे,अलका भटकर,ललित धांडे, आर आर धनगर, नलिनी वानखेडे,हरीश कोल्हे,सचिन पाटील,ईश्वर पवार,किरण पाटील,योगेश जाधव,रुपेश पाटील,कृष्णा शिंदे,मा.शा.पाटील, ए जे पाटील, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आदिनी परिश्रम घेतले.

३० परिक्षकानी केले परिक्षण

प्रा. जे. एफ. पाटील, प्र. ह. दलाल, डॉ. दिनेश महाजन, सुनिल वानखेडे,सतीश कुलकर्णी,अमितकुमार पाटील,प्रसन्ना बोरोले,ललित फिरके,नामदेव महाजन, नाना पाटील, हेमलता चौधरी, अनिल देशपांडे, सोनाली वासकर, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी,अर्चना शर्मा,जीवन सपकाळे, ऋषिकेश पवार, आनंदा सपकाळे, समीर तडवी, वंदना भिरुड, प्रमोद आठवले, रवींद्र पाटील,,शाम दुसाने,प्रशांत पाटील,दीपक पाटील,पी. जे. चौधरी, दिनकर जावळे, रिता शर्मा आदिनी परिक्षण केले.

स्पर्धेचा हेतु साध्य
अंतर्नाद प्रतिष्ठान आणि शिक्षण विभाग यांनी सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविला असुन सदर स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचे विचार बालमनावर पेरण्याचे काम होत असुन सद्य परिस्थिती मध्ये ते फार महत्वाचे आहे.सदर उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरुप देण्याची गरज आहे असे पालीका सभापती मुकेश पाटील यांनी सांगितले.

Protected Content