शेतातून लोखंडी पाईपांची चोरी; गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील शेतातून ७५ हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुमारास समोर आले आहे.  याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सुधाकर रामअवतार सिंग (वय-४२) रा. दीपनगर कॉलनी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील शेतात कामावर आहे. दरम्यान १४ सप्टेंबर सायंकाळी ६ ते १५ सप्टेंबर ८ आठ वाजता दरम्यान भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील शेतात कंपनीच्या मालकीचे लोखंडी पाईप गॅस कटरने कापून सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. हा संदर्भात हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथे काम करणारा सुधाकर राम अवतारसिंग याने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील करीत आहे.

Protected Content