पुन्हा हादरले जळगाव : हरिविठ्ठल नगरात खून

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात एका तरूणाचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अलीकडच्या काळात जळकी मील परिसरात मद्यपान करणार्‍या मित्रांमध्ये वाद झाल्यामुळे यातून चाकूने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे बसलेला हादरा शांत होत नाही तोच आज पुन्हा एकदा तरूणाचा खून झाल्याने खळबळ उडालेली आहे.

या संदर्भातील प्राथमिक माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरातील रहिवाशी असणार्‍या दिनेश भोई याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्री साडेआठच्या सुमारास हल्ला चढविला. यात तो जबर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू पुर्व वैमनस्यातून झाला की, याला अन्य बाबींची किनार आहे याबाबत मात्र काहीही स्पष्ट झाले नाही. या संदर्भात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Protected Content