पहूर येथे ‘होम क्वारंटाईन ‘ केलेल्यांचा मुक्त संचार ; गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात !

 

पहूर, ता . जामनेर, प्रतिनिधी । सध्या पहूर येथे मुंबई , पुणे या सारख्या रेड झोनमधून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून त्यांना होम क्वारंटाईन केले असले तरी त्यांचा गावात मुक्त संचार सुरू असल्याने गावकऱ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे . त्यामुळे भविष्यात कोरोनाचा शिरकाव गावात झाल्यास यास जबाबदार कोण ? असा सवाल सुज्ञ नागरीकांमधून करण्यात येत आहे .

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून शासन स्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत . तथापी शासनाने लॉक डाऊन काळात बाहेरगावी अडकून पडलेल्या मजूर, कामगार यांना आपल्या मुळ गांवी येण्याची परवानगी दिल्याने मुंबई, पुणे यासारख्या रेड झोनमधून असंख्य लोक आपल्या मुळ गांवी आले आहेत . त्यांना तपासणीनंतर रुग्णालयातून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला असून त्यांना आपापल्या घरात राहणे बंधनकारक असताना सुध्दा त्यांचा गावात नातेवाईक , शेजारीपाजारी , मित्रपरिवार यांच्याकडे मुक्तपणे संचार सुरू आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वास्तविक होम क्वारंटाईन केलेल्यांची माहिती पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, तसेच आरोग्य विभाग यांच्याकडे असते. मात्र संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतू, यामुळे भविष्यात कदाचित कोरोनाचा गावामध्ये शिरकाव झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न सुज्ञ नाकरीकांमधून विचारला जात आहे.

Protected Content