बोढरे येथे नेत्र तपासणी शिबिर

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे मारवाडी युवा मंच व रोटरी आय रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  नेत्र तपासणीसह शस्त्रक्रिया शिबीराचे  ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले.

गरजवंताला डोळ्याची तपासणी मोफत करता यावी या पाश्र्वभूमीवर जी.आर.सप्लायर्स व विनीत राठोड मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून मारवाडी युवा मंच व रोटरी आय रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणीसह शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन तालुक्यातील बोढरे येथील ग्रामपंचायतीत गुरूवार रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक बंकट पेलाद जाधव यांनी प्रथम नेत्र तपासणी करून घेतली. सदर शिबिरात एकूण १०७ जणांनी नेत्र तपासणी केली. त्यातील ९ जणांवर मालेगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यात गरजू रेशनकार्ड धारकांवर लेन्सची शस्त्रक्रिया हि मोफत तर अन्य रूग्णांवर शस्त्रक्रिया माफप दरात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या  शिबिराचे आयोजनासाठी मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष आशुतोष वर्मा, सचिव भुपेश खिवसरा व प्रकल्प प्रमुख संजय आग्रावत यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान नेत्र तपासणी हि मोफत करता आली म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. यावेळी ऑप्टीमॅट्रीक्स योगेश मार्तंड, अजय साळुंखे, चालक- सुरेश पवार, अमोल घुमरे, विनीत राठोड, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अविनाश राठोड, अशोक राठोड, योगेश चव्हाण, वसंत चव्हाण, महेश चव्हाण, निवृत्ती राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content