कोरोना : जिल्ह्यात आज ३३ बाधित रूग्ण आढळले; ५२ रूग्ण झाले कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५२ रूग्ण बरे होवून घरी परले आहे. जिल्ह्यात सध्या ४३२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-८, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-७, अमळनेर-१, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-३, पारोळा-७, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३३ बाधित रूग्ण आढळले आहे.

आज आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५६ हजार ८४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज एकाही रूग्णाचा मृत्यूची नोंद नसून आतापर्यंत १ हजार ३५१ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Protected Content