पहूर येथे तीन दिवस जनता कर्फ्यू

पहूर, ता. जामनेर रविंद्र लाठे । जामनेर तालुक्यातील कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट ठरलेल्या पहूर येथे  शनिवार , रविवार , सोमवार असे तीन दिवस ( दि. १ ३ मार्च ते १५ मार्च )  कडकडीत ‘ जनता कर्फ्यू ‘ लागू करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. 

यावेळी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ सभेच्या अध्यक्षस्थानी होते .

यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा ,माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे,  डॉ. भारती ए .लेले , डॉ. अनिकेत लेले , डॉ . रवींद्र बडगुजर , डॉ . प्रशांत पांढरे , डॉ . जितेंद्र वानखेडे , डॉ . जितेंद्र घोंगडे, डॉ.  रमेश पाटील, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे , अरुण घोलप , शैलेश पाटील , मनोज जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले .

हे राहणार चालू 

तीन दिवसीय लॉकडाउन काळात मेडिकल , दवाखाना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरु राहणार आहे . या व्यतिरिक्त सर्व प्रतिष्ठाने बंद राहतील. बंद काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले .

या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी पत्रकार व्यापारी उपस्थित होते. यावेळी कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.

आज पुन्हा पहूर येथे १५ जण पॉझीटीव्ह

आज पुन्हा पहूर येथे अकरा जण तर पहूर येथीलच शेंदुर्णी येथे तपासणीत चार झण असे एकूण १५ जण पाॅझीटीव्ह आले आहेत. गेल्या शुक्रवार पासून आज पर्यंत ६५ रूग्ण उपचार घेत आहेत.

उद्या कोरोना तपासणी कॅप

कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्या करीता उद्या पहूर ग्रामीण रूग्णालयात कोरोना तपासणी कॅप सकाळी नऊ ते बारा या वेळेत रहाणार असल्याचे पहूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जितेंद्र वानखेडे यांनी सांगितले आहे.

 

Protected Content