हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सण साजरे करावे – एस.पी. प्रवीण मुंडे

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन सण साजरे करावे, असे आव्हान पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केले. जामनेर पोलीस स्टेशनतर्फे आयोजित रोजा इफ्तार पार्टीत बोलत होते.

त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या पोस्ट लगेच डिलीट करा व याबाबत पोलिसांना माहिती द्या, कारण यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही व शहरात शांतता राहील असे देखील आव्हान पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केले.

आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर शहरात आम्ही सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन सर्व सण साजरा करतो. त्यामुळे कोणत्याही  प्रकारे अशांतता होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी कार्यक्रमात बोलताना दिली.

यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका पाटील नगरपालिका उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे, अरुण राठोड, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!